पासपोर्ट कसा मिळवाल ?


नमस्कार मित्रांनो,
आजच्या Post मधे मी आपल्याला कायदेशिर पद्धतीने पासपोर्ट मिळवण्याची संपूर्ण Process in Detail समजावून सांगणार आहे. 
*Basically पासपोर्ट म्हणजे आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रितसर कायदेशीर परवानगी.
*ही प्रक्रीया अत्यंत साधी व सोपी अशी आहे.
*पासपोर्ट साधारण ५० दिवसांत मिळतो व तात्काळ पाहिजे असेल तर साधारण ७ दिवसात मिळतो.
*पासपोर्ट कार्यालयाकडून संबधित व्यक्तीस १० वर्षांसाठी पासपोर्ट जारी केला जातो.

Step )
सर्वप्रथम पासपोर्टसाठी भारतसरकारच्या पुढील संकेत स्थळावर जाउन ऑन लाईनअर्ज दाखल करावा लागतो. तुमच्याजवळ असलेला कोणताही Browser ( Google Chrome or Firefox ) Open  करा  आणि  पुढील Address Type करा.





Step )
पानाच्या डाव्या बाजूला Forms & Affidavits Corner ” च्या मधे Download e-Form option  वर Click करा.




























Step )
नविन पान Open होईल त्यामधे खालील प्रमाणे Options दिसतील.
जर तूम्ही Freshers ( पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करीत असाल.
तर Fresh or Reissue of Passport वर Click करा.
लगेचच "PassportApplicationForm_Main_English_V1.0.zip
(size 709.40  kb) नावाचा फॉर्म Download  होईल.
 

Download  केलेला फॉर्म ( जो Zip File मधे असेल ) त्याला Winzip किंवा Winrar ( Zip File Open करण्यासाठी आवश्यक असलेले Software) ने Open करा. आता Open झालेली Window पूढीलप्रमाणे दिसेल. 
(जर आपल्याकडे Winzip किंवा Winrar Software नसेल तर पूढे दिलेल्या Link वरून Download करा.)
1) Winrar 
2)  Winzip





         आता आपल्यासमोर नविन Window Open झालेली दिसेल.

  
आता PassportApplicationForm_Main_English_V1.0 हा फॉर्म Adobe Reader XI ने Open करा आणि काळजीपूर्वक भरा.
(जर आपल्याकडे Adobe Reader XI Software नसेल तर येथून Download करा.) 

( टिप - फॉर्ममधील Type of Passport Booklet समोर ३६ Pages आणि ६० Pages पैकी एकावर टिक करा.

 १) जर ३६ Pages वर टिक केले तर आपल्याला १५००/- शुल्क आकारण्यात येईल.

 २) जर ६० Pages वर टिक केले तर आपल्याला २०००/- शुल्क आकारण्यात येईल. )



संपूर्ण फॉर्म भरून झाल्या नंतर “ VALIDATE AND SAVE ” वर Click करा तो फॉर्म Save करा
( फॉर्म XML Document या Format मधे Save होईल.)
 
Step )

पून्हा http://passportindia.gov.in वेबस्थळावर जाऊन Register Now या Option वर Click करा.

Registration फॉर्म Open होईल,फॉर्म भरून Register करा.
(टिप Login Id आणि Password काळजीपूर्वक भरा लिहून ठेवा.)




Register केल्यानंतर तुम्हाला तुमच्या E-Mail मधे “Passportindia यांच्याकडून Registration Confirmation” असा E-Mail येईल, त्या E-Mail मधे तुम्हाला passportindia.gov.in या संकेतस्थळावरील Account Activate करण्यासाठी "URL Link" दिलेली असेल.त्या Link वर Click करून तूम्हाला Account Activate करायचे आहे.


आता Open  झालेल्या पानावर "Enter User Id"  मधे तुम्ही लिहून ठेवलेला Login Id  टाईप करा. आणि Submit  करा.
आता Account Successfully Activate  झाल्याचे पान Open होईल. त्याच पानावर Click Here To Login वर Click करा.

Open झालेल्या पानावर पुन्हा Login Id टाईप करून Continue  करा.

आता लिहून ठेवलेला Password टाईप करून Login करा.

नंतर पुढील पान Open होईल.



आता Step 3) च्या अखेरीस  XML Document या Format मधे Save केलेला फॉर्म निवडा व Upload करा.


नंतर Open झालेल्या पानावर पासपोर्टसाठीची रक्कम  भरण्यासाठी दोन पद्धतींचे पर्याय उपलब्ध असतील.

१)  Online Payment (Internet Banking, Debit Card, Credit Card)
२)    चलन Payment (Pay in Cash at SBI Branch

यापैकी आपणास सोईस्कर अशा एका पर्यायासमोर टिक करा. शक्यतो दुसरा पर्याय “चलन Payment” हा सुरक्षित व सोईस्कर आहे.


Generate Chalan वर Click केल्यावर चलन ची प्रत pdf Format मधे Download होईल.
चलन च्या प्रतीची Print काढल्यानंतर योग्य ती माहिती भरुन भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) मधे जमा करावी.

चलन ची प्रत Submit केल्यानंतर दोन दिवसांनी passportindia.gov.in या संकेतस्थळावरील Account Login करा.





( साधारण २ ते ३ दिवसांनंतर ) जर Payment ची स्थिती “Success” अशी दिसत असेल तरSchedule Appointment ” या Link वर Click करून तुम्हाला appointment घेता येईल.
पासपोर्ट कार्यालयाकडून अर्जदारास भेटीसाठी एक तारीख (Appointment Date) दिली जाते. भेटीची तारीख निश्चित झाल्यानंतर Submit केलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. पासपोर्ट कार्यालयाकडून आपल्याला भेटीसाठी दिलेल्या तारखेस, Original कागदपत्रे व त्यांच्या दोन Xerox प्रती घेऊन पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळणीसाठी उपस्थित राहा
महत्त्वाची टीप - जर काही अपरिहार्य कारणांमुळे आपणांस Appointment Cancel करावी लागलीच तर तुमच्याजवळ अजूनही २ संधी उपलब्ध आहेत. )
Recent Posts Widget

Total Pageviews